[ad_1]
परभणी : हरभरा हमीभावाने (प्रतिक्विंटल ५२३० रुपये) खरेदीसाठी शुक्रवार (ता.४) पर्यंत परभणी जिल्ह्यात ३१२४ शेतकरी आणि हिंगोली जिल्ह्यात ३९१३ अशा एकूण ७०३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बुधवार (ता.२) पासून हिंगोली जिल्ह्यात सहा आणि परभणी जिल्ह्यात एका केंद्रावर खरेदी सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी बुधवार (ता. १६)पासून ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू आहे. नाफेडच्या वतीने पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, बोरी (ता. जिंतूर), सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांत २ हजार ४७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २१ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. पूर्णा येथे खरेदी सुरू झाली आहे. सोमवार (ता.७) पासून परभणी तसेच अन्य केंद्रांत खरेदी सुरू होईल.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव (ता. हिंगोली), कळमनुरी, वारंगफाटा, वसमत, जवळा बाजार (ता. औंढानागनाथ), सेनगाव, साखरा या आठ केंद्रांत एकूण ३ हजार ९१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २३६ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील केंद्रावर ११०० शेतकऱ्यांकडून अर्ज आले आहेत. त्यापैकी ६४७ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. परंतु अद्याप खरेदीस सुरुवात झाली नाही.
आवश्यक कागदपत्रे
रब्बी हंगाम २०२१-२२ मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्क्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये), संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.