[ad_1]
चांडोळ, जि. बुलडाणा : शेतकऱ्यांवर सातत्याने निसर्गाचे संकट, घटणारी पिकांची उत्पादन क्षमता आणि वाढलेला उत्पादन घेण्याचा खर्च पाहता केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. यामध्ये दर वर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य अनुदान तीन टप्प्यात वितरित होते. परंतु, आता यापुढे सदर अनुदान प्राप्त करण्यासाठी ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, ग्रामीण भागातील ई-केवायसी काय असा प्रश्न विचारला जात आहे. अनेकांमध्ये याविषयी गोंधळ दिसून येतो. याबाबत कृषी, महसूल विभागाच्या माध्यमातून माहिती देण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण दहा हफ्ते शेतकऱ्यांनी घेतले आहेत. मात्र, किसान सन्मान योजनेच्या अकराव्या हप्त्याचा लाभ प्राप्त करण्यासाठी तसेच बोगस लाभार्थी शोधण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा एप्रिल महिन्यात मिळणारा अकरावा हप्ता तसेच त्या पुढील हफ्त्यांचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यापुढे आता ज्या पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले असेल त्याच शेतकऱ्यांनाच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी नजीकच्या आपले सेवा सरकार केंद्राशी संपर्क साधावा, असे सांगितले असले तरी, यामध्ये अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
‘आधार’ला मोबाइल संलग्नित हवा
पीएम किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्याचे आधार कार्डवर जो संपर्क क्रमांक दिला जोडला आहे. त्यातील अनेकांचे नंबर बदललेले आहेत तर अनेकांचे बंद झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना ओटीपी प्राप्त करण्यासाठी व आधार व्हेरिफिकेशनसाठी अडचणी येत आहे. त्यासाठी सीएससी केंद्रावर जाताना आपला मोबाइल सोबत ठेवणे आवश्यक आहे.
अनेक तांत्रिक अडचणी
पीएम किसान शेतकरी सन्मान योजना २०१९ पासून सुरू करण्यात आली. यात अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. मात्र आता ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात फॉर्मर कॉर्नरमधील केवायसी ऑप्शन न उघडणे, इनव्हॅलिड ओटीपी दाखवणे, डाटा नॉट फाउंड यांसारख्या तांत्रिक अडचणी उद्भवत आहे.

[ad_2]
Source link