[ad_1]
नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटकाला नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वच बाजार समित्या सावध झाल्या असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमधील शेतमालाचे लिलाव सुरू राहावेत, यासाठी बाजार समित्यांमध्ये योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांपैकी १५ बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेट खरीप व उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रण करण्यापासून ते प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह नियमावली कडक करण्यात आली आहे. बाजार समिती आवारावर कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रण करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज होत आहे. यासह ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे उद्घोषणा करून वेळोवेळी नियमित सूचना दिल्या जात असल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.
घेतली जाणारी खबरदारी:
- बाजार समिती आवारात प्रत्येकाला तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अनिवार्य
- बाजार आवारात येणाऱ्या व्यक्तीचे तापमान तपासणी
- सर्दी, ताप, खोकला असलेल्या, आजारी व्यक्तीने बाजार समितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेशास बंदी
- लिलावाच्या आदल्या दिवशी मुक्कामी येण्यास मनाई
तर दंड करण्यासह पोलिसांना कळविणार
धूम्रपान केल्यास व्यक्तीस एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. यासह आजारी व्यक्तीने प्रवेश केल्यास आरोग्य विभागास आणि अनधिकृतरीत्या आवारात किंवा कांदा लिलावाच्या ठिकाणी आल्यास अथवा वाहन पार्किंग केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला कळविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.