[ad_1]
बुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने या हंगामात जिल्ह्यात १० केंद्रावर हरभऱ्याची हमीभावाने खरेदी केली जात आहे. हंगामात आतापर्यंत सुमारे ७८ हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली. तर खरेदीपोटी शेतकऱ्यांना ३५ कोटींचे चुकारेही वितरीत झाल्याचे ते म्हणाले.
शासनाच्या नियमानुसार यंदा जिल्हा पणन कार्यालयामार्फत बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार, मेहकर, मोताळा, संग्रामपूर, शेगाव, साखरखेर्डा, सिंदखेडराजा, उंद्री या १० केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली होती. यंदा हरभरा विकण्यासाठी १७,४२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत मोबाइल संदेश देण्यात आले. यापैकी सुमारे साडे चार हजार शेतकऱ्यांचा ७८,७१४ क्विंटल हरभरा मंगळवारपर्यंत (ता.२५) खरेदी झाला होता. यात सर्वाधिक शेगाव केंद्रावर २५,५८७ क्विंटल खरेदी झाली. या शिवाय मोताळा केंद्रावर १३,९४७ क्विंटल तर साखरखेर्डा केंद्राने १०,२२४ क्विंटल खरेदी केली. इतरही केंद्रावर समाधानकारक खरेदी झाली.
यंदा खुल्या बाजारातही आधारभूत किमतीच्या ५१०० बरोबरीने दर मिळाले. काही दिवस यापेक्षा अधिक दर मिळाला होता. तरीही शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रावर आपला शेतमाल विक्रीसाठी आणला.
अशी झाली खरेदी
- हरभरा एकूण खरेदी-७८७१४ क्विंटल
- शेतकरी संख्या-४४९९
- खरेदी किंमत- ४० कोटी
- चुकारे- ३५ कोटी
प्रतिक्रिया
यंदा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पणन विभागाने १० केंद्रे उघडून खरेदी सुरू केली. शेगाव केंद्रावर सर्वाधिक २५ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला. शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या मालाचे सुमारे ३५ कोटींचे चुकारेही खात्यात जमा केले आहेत.
– पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.