[ad_1]
नगर : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भगवानगड लमाणतांड्यावरील महिलेवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. दोन्ही पायांनी अधू असलेले पती मदतीला धावल्याने महिलेचे प्राण वाचले. दिव्यांग पतीने हातातील काठीने त्यांनी बिबट्याचा प्रतिकार सुरूच ठेवल्याने बिबट्याला माघार घेत तेथून पळ काढावा लागला.
वन विभागाने आतापर्यंत तीन बिबट्याला पकडले असतानाही पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. मात्र, त्यावेळी दुर्लक्ष झाले. शनिवारी (ता. २१) गडाच्या पायथ्याशी असलेल्या तांड्यावरील छबूबाई राठोड (वय ४५) व दिव्यांग पती एकनाथ राठोड डोंगरालगतच्या शेतात काम करीत होते.
सायंकाळी चारच्या सुमारास बिबट्याने छबूबाई यांच्यावर अचानक झडप घातली. या प्रकाराने गांगरलेल्या छबूबाई यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. बिबट्याने तोंडावर पंजा मारल्याने छबूबाई गंभीर जखमी झाल्या. जवळच असलेले दिव्यांग पती एकनाथ राठोड हातात काठी घेत मदतीसाठी धावले. काठीने त्यांनी बिबट्याला प्रतिकार सुरू केला. अखेर बिबट्याने माघार घेतली.
गंभीर जखमी अवस्थेत छबूबाई यांना खरवंडी येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वनाधिकाऱ्यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. छबूबाई राठोड यांचे पती एकनाथ हे दोन्ही पायांनी अधू आहेत. चालण्यासाठी त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. तीच काठी आज पत्नीचे प्राण वाचविताना मदतीला आली. दिव्यांग असतानाही पत्नीचे रक्षण करणाऱ्या एकनाथ राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले. मात्र बिबट्याच्या भीतीने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

[ad_2]
Source link