[ad_1]
पुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे आज (ता.२०) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उद्या (ता.२१) राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात आज (ता.२०) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
बंगाल उपसागराचा नैऋत्य भाग व उत्तर तामिळनाडूची किनारपट्टी दरम्यान असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागर पश्चिममध्य भाग व आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व परिसर, दक्षिण ओडिशा या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.
मंगळवारी (ता.२२) कोकण आणि विदर्भात मध्यम पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल. बुधवारी (ता.२३) कोकण वगळता अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

[ad_2]
Source link