[ad_1]
कोल्हापूर | माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि आपल्यात मैत्रीपूर्ण संबंध असून काही लोक जाणुनबुजून यात वितुष्ठ आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणटले आहे. त्याचबरोबर झालेल्या प्रकारामुळे मुश्रीफ यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखानाच्या वजन काट्याबद्दल माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शंका उपस्थित करून काटा तपासण्याची मागणी केल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. मुश्रीफ वजनात काटा मारतात, त्यांच्या कारखान्याच्या दराबाबत काही बोलू नका, अशा शब्दात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर निशाना साधला होता.
दरम्यान यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर महाडिक यांनी एक प्रसिध्दीपत्रक काढले असून मंत्री मुश्रीफ यांची जाहिर दिलगिरी व्यक्त केली आहे. पत्रकात महाडिक यांनी संताजी घोरपडे कारखान्याचे कामकाज मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे चालू असल्याचे म्हणटले आहे. तसेच भेटण्यास आलेल्या सभासदांसमोर आपण कोणत्याही कारखान्याचे नाव घेतले नसल्याचे सांगून काही लोकांनी जाणूनबुजून आपल्या तोंडी चुकीचे वक्तव्य घुसडून मुश्रीफ यांच्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणटले आहे.
मंत्री मुश्रीफ आणि आपल्यातील मैत्रीत वितुष्ट आणणे आणि राजाराम कारखान्याच्या संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने हा प्रयत्न केला असल्याचेही महाडिक यांनी आपल्या पत्रात म्हणटले आहे.
[ad_2]
Source link