[ad_1]
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्टब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यतः कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतही प्रगती झाली नाही. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे.
बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांच्या पोर्टब्लअरपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यंदा मॉन्सून चार दिवस उशिराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.२९) अरबी समुद्रात मॉन्सून दाखल होणार असल्याने पुढील वाटचालीबद्दल आशा उंचावल्या आहेत

[ad_2]
Source link