[ad_1]
पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटीआयला प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे.
यंदा आयटीआय प्रवेशासाठी एक लाख ४५ हजार ६३२ जागा उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज सध्या आले आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता नाही. आयटीआय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. ३१) अंतिम मुदत आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत. राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.
राज्यातील आयटीआयची स्थिती
- शासकीय आयटीआय संस्था ः ४१७
- आदिवासी भागातील संस्था ः ६१
- खासगी संस्था : ५३८
- अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या मुलामुलींसाठी ः चार संस्था
- अल्पसंख्याकांसाठी ः दोन संस्था
- शासकीय संस्था ः ४३
- आदिवासी आश्रमशाळा ः २८
- एकूण प्रवेश क्षमता : एक लाख ४५ हजार ६३२

[ad_2]
Source link