[ad_1]
येरोळ, जि. लातूर : ‘‘तरुणांनी रेशम शेतीकडे वळावे. या योजेनेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन शेती केली, तर कमी मेहनत व वेळेत एकरी चार लाख रुपये उत्पादन वर्षाकाठी मिळणारा हा शेती व्यवसाय आहे. तरुण शेतकऱ्यांसाठी या उद्योगात मोठी संधी आहे,’’ असे मत कृषी सहायक बी. एल. गुजुटे यांनी व्यक्त केले.
जांभळवाडी (ता. शिरुर अनंतपाळ) येथे तालुका कृषी विभागातर्फे नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत रेशीम शेती उद्योग करण्यासाठी शेतकरी बचतगटाची बैठक झाली. गुजुटे म्हणाले, ‘‘ शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा रेशिम कार्यालयाकडे सातबारा, आठ अ, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड व सभासद नोंदणी शुल्क पाचशे रुपये भरुन २१ मार्च २०२१ पर्यंत सभासदं व्हावे. या योजनेचा लाभ घ्यावा.’’
‘‘या योजेनेमध्ये शेतकऱ्यांनी शेतावर तुती लागवड करावी. त्यांना या योजेनेतून २ लाख २६ हजारांचे अनुदान तीन टप्प्यामध्ये मिळेल. यात शेतकऱ्यांनी तुती लागवड करणे, शेड उभारणी, संगोपण साहित्य आदीसाठी सबसीडी देण्यात येईल,’’ अशी माहिती कृषी सहायक डी. बी. शिंदे यांनी दिली.
राम बालवाड, गुडेराव चौसष्टे, दिनेश नरहरी, रामराव साकोळकर, चंद्रकांत सारसेकर, बालाजी बेबंडे, भरत नामदे, नामदेव भुसागरे, पांडुरंग शिरुळे, रमेश पिचारे आदी उपस्थित होते.

[ad_2]
Source link