[ad_1]
नगर ः नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या लाळ्या खुरकूत, घटसर्प रोगांच्या प्रादुर्भावाने जनावरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सात गावांत सुमारे १०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून आतापर्यंत सुमारे ५ हजार ५६३ जनावरांना लाळ्या खुरकूत, घटसर्पाचे लसीकरण केले आहे. मृत जनावरांत बहुतांश जनावरे संकरित व दुभती असल्याने मोठा आर्थिक फटका बसत असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत्ती, कुकाना, नांदुर शिकारी, भेंडा (खुर्द व बुद्रुक) देवगाव आदी गावांत लाळ्या खुरकुताच्या साथीने जनावरांचा मृत्यू होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे १०३ जनावरे यात दगावली आहेत. त्यात देशी गाई पाच व २ खिलार वगळता इतर ९६ जनावरे संकरित (एचएफ) आहेत. या आजाराने दोनपेक्षा अधिक जनावरे बाधित झाली आहेत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंबारे यांच्या पथकाने या भागात तातडीने लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत साथ उद्भवलेल्या गावांतील ५ हजार ५६३ जनावरांना लाळ्या खुरकूत, घटसर्पाचे लसीकरण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे दूध व्यवसाय अडचणीत आहे. शेतीलाही अनेक संकटाला सामोरे जावे लागत असताना लाळ्या खुरकूत, घटसर्पाच्या साथीने अचानक जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याने शेतकरी, पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
गावनिहाय मृत जनावरे
जेऊर हैबत्ती ः ५०, कुकाणा ः ५, भेंडा बुद्रुक ः ८, भेंडा खुर्द ः २३, नांदूर शिकारी ः ६, तरवडी ः ६, देवगाव ः ५

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.