[ad_1]
नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने लासलगाव (ता. निफाड) येथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दररोज सरासरी ४ ते ५ व्यक्ती झाले आहे. तसेच बाहेरगावहून शेतीमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी वर्ग व लिलावप्रसंगी होणारी गर्दी यामुळे कोरोनाची साखळी तोडणे मुश्कील झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक कांदा व धान्य व्यापारी आणि कामगार वर्ग कोरोना बाधित झाले आहेत. अशा आशयाचे निवेदन व्यापारी वर्गाने लासलगाव बाजार समिती व्यवस्थापनास देत १९ ते २५ एप्रिलदरम्यान धान्य व कांदा लिलावात सहभागी होणार नसल्याबाबत कळविले आहे. मात्र तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद ठेवता येणार नसल्याने व्यवस्थापन गोंधळात सापडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लासलगाव ग्रामपंचायतीने १९ ते २४ एप्रिल बंद पुकारला आहे. फक्त दवाखाने व मेडिकल स्टोअर्स सोडून सर्व व्यवसाय बंद ठेवून गावातील सर्व व्यावसायिक या कालावधीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूत सहभागी होणार आहे. त्यामुळे कांदा व धान्य विभागातील व्यापारीही या दरम्यान लिलावाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असे कळविले आहे. दिलेल्या निवेदनावर एकूण ३० व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बाजार समितीने मागविले मार्गदर्शन
ग्रामस्थांच्या बैठकीनंतर व्यापारी वर्गाने निर्णय घेत कामकाजात सहभागी न होण्याबाबत निवेदन लासलगाव बाजार समितीला दिले आहे. यावर सचिव व सभापतींची चर्चा झाली. मात्र बाजार समित्या सुरू ठेवा अशा पणन संचालनालयाच्या सूचना असल्याने बाजार समिती व्यवस्थापन गोंधळात सापडले आहे. यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागवल्याचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
भाजीपाला धान्य जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्याने बाजार समिती बंद ठेवता येणार नाही. मात्र व्यापारी वर्गाने निवेदन दिल्याने पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मार्गदर्शन मागवले आहे. अजून तरी बंदबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
– सुवर्णा जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावपणन संचालनालयाच्या सूचना मान्य आहेत. मात्र संसर्ग वाढत असून, आतापर्यंत ५ व्यापारी कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे हे संसर्गाचे प्रमाण कसे आटोक्यात आणणार. गर्दी नियंत्रण होत नसल्याने ही स्थिती आहे. सध्या आम्हालाही जीव प्रिय आहे. बाजार समितीने योग्य ती कार्यवाही करावी.
– नंदकुमार डागा, अध्यक्ष, लासलगाव व्यापारी असोसिएशन

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.