[ad_1]
जळगाव : खानदेशात लॉकडाउनच्या भीतीने पक्व किंवा काढणीवर आलेले कलिंगड काढणीला वेग आला आहे. दर स्थिर असून, जागेवरच पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.
कलिंगडाच्या दरात मागील पंधरवड्यात किलोमागे एक ते दीड रुपये घसरण झाली आहे. परंतु गेले चार दिवस दर स्थिर आहेत. सध्या कलिंगडाची काढणी धुळ्यातील शिरपूर, धुळे, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागात अधिक होत आहे. याच भागात तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीकाठच्या भागात लागवड झाली होती. यंदा लागवड सुमारे पाच हजार हेक्टरवर झाली होती.
चोपडा, जळगाव, शिरपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लहान किंवा कांदेबाग केळी पिकात आंतरपीक म्हणून कलिंगड घेतले आहे. आगाप लागवडीच्या पिकाची काढणी मार्चच्या सुरवातीला सुरू झाली. तर हंगामातील लागवडीच्या कलिंगडाची काढणी गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे.
…यामुळे दर नरम
सध्या खानदेशात प्रतिदिन सरासरी १३ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) कलिंगडाची आवक होत आहे. खरेदी धुळे, शिरपूर, चोपडा, जळगाव, जामनेर, रावेर आदी भागातील एजंट करीत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कलिंगडाची पाठवणूक सुरू आहे. आवक वाढली आहे. यामुळे दरात किंचित घसरण झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या भीतीतही मागणी टिकून असल्याने दरात मोठी घसरण झालेली नाही. काढणी आणखी १० ते १२ दिवस सुरू राहणार आहे. यानंतर फारसे कलिंगड जळगाव, धुळ्यात काढणीसाठी उपलब्ध नसणार अशी स्थिती आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.