[ad_1]
अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्तावर उतरत आंदोलन केले. या विधेयकांच्या प्रतिची कार्यकर्त्यांनी होळी केली.
निंबा फाटा येथे होळी
अकोला जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात निंबा फाटा येथे सभा घेत होळी करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधण्याचे काम हे केंद्र सरकार करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही. त्यासाठी देशभर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांनी दिली. पंकज दुतंडे, विष्णू निर्मल, रवी क्षीरसागर, प्रवीण दामोदर, साबिर शहा, सचिन दामोदर, विकास दामोदर, गजानन मोळक, मंगेश राठोड, सचिन निर्मळ, अजय दामोदर, राजू प्रधान, गणेश भटकर आदी उपस्थित होते.
वाशीममध्ये अर्धनग्न आंदोलन
वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात अर्धनग्न आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र येत शेतकरी विरोधी बिलाची होळी केली. यावेळी बालाजी मोरे, विशाल गोटे , गोपाल भिसाडे, विनोद भिसाडे, निलेश थोरात, राहुल धामणे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बुलडाण्यात तुपकरांकडून आंदोलन
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात तीन विधेयके संसदेत पारीत केली आहेत. या कायद्याला विरोध म्हणून बुलडाणा जिल्ह्यात सावळा फाटा येथे शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. तुपकर व कार्यकर्त्यांनी या तिनही बिलांची होळी केली. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढीत आहे. शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दारात उभे करीत असल्याचा आरोप तुपकर यांनी यावेळी केला.

[ad_2]
Source link