[ad_1]
नाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. राज्यातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते राज्यात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे; अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठक सोमवारी (ता.२१) झाली. माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नाशिक मुख्य अभियंता अलका अहिरराव, अरुण नाईक, राहुल पाटील, सागर शिंदे, राजेंद्र शिंपी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा. जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सहप्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य द्या. त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करावी.’’
तेलंगणास्थित कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करावा. सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ प्रकल्पाचे काम हाती घ्यावे. यासोबतच नदीजोड प्रकल्पासाठी ‘मुख्य अभियंता’ या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

[ad_2]
Source link