[ad_1]
पुणे : मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. विदर्भात चाळिशी पार गेलेला पारा चांगलाच घसरला आहे. काही ठिकाणी
उन्हाचा चटका अजूनही कायम आहे. मात्र येत्या काही दिवसांत उन्हाचा चटका कमीअधिक होऊन उकाडा कमी होईल. शुक्रवारी (ता.२१) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात सकाळपासून ऊन वाढत असले, तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होत आहे. सायंकाळी काही प्रमाणात गारवा तयार होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही घट होऊ लागली आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.
नागपूरमध्ये सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसने घट होऊन ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील सर्वंच भागांत तापमानात घट झाली असून ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यात ३३ ते ३७, मध्य महाराष्ट्रात २६ ते ३६ तर कोकणात २८ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.
सध्या तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे मध्यरात्रीनंतर थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. महाबळेश्वर येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. उर्वरित भागातही किमान तापमानात चांगलीच घट झालेली होती.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर
रविवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर
सोमवार ः संपूर्ण महाराष्ट्र
मंगळवार ः महाराष्ट्राचा दक्षिण भाग
शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- मुंबई (सांताक्रूझ) ३३.२
- अलिबाग ३३.६
- रत्नागिरी ३१.९
- डहाणू ३३.३
- पुणे ३३.७
- कोल्हापूर ३१.६
- महाबळेश्वर २६.१
- मालेगाव ३६.८
- नाशिक ३२.९
- सांगली ३५
- सातारा ३३.७
- सोलापूर ३६.५
- उस्मानाबाद ३३.२
- औरंगाबाद ३६.४
- परभणी ३७.२
- अकोला ३७.८
- अमरावती ३५.४
- बुलडाणा ३५.४
- ब्रह्मपुरी ३८.४
- चंद्रपूर ३८.६
- गोंदिया ३६.८
- नागपूर ३६.१
- वाशीम ३७
- वर्धा ३७

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.