[ad_1]
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी एक सुपर अॅप लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. ज्यामध्ये अनेक डिजिटल संस्था (Digital Orgnization) आणि त्यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या अॅप्सचा एकत्रितपणे समावेश असणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.
या अॅप्स एकत्रिकरणामुळे कृषी क्षेत्रातील नवीन संशोधन (new research) आणि विकास, हवामान (Weather), बाजारातील ताज्या घडामोडी, उपलब्ध सेवा, सरकारी योजना आणि विविध कृषी हवामान क्षेत्रांसाठीची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळू शकणार आहे. किसान सुविधा, पुसा कृषी, पीएम किसान, शेतकरी मासिक अँड्रॉइड अॅप, फार्म-ओ-पीडिया, क्रॉप इन्शुरन्स अँड्रॉइड अॅप, अॅग्रीमार्केट, इफ्को किसान आणि आयसीएआरचे कृषी ज्ञान यांसारखे अॅप्स एकत्र करण्याचा कृषी मंत्रालय विचार करत आहे.
सुपर अॅप अंतर्गत एकाच ठिकाणी विविध अॅपचे संकलन केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवांची निवड करता येणार आहे. संबंधित अॅप शोधण्यासाठीची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी या अॅप्सना एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.
या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतीच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत सुपर अॅपच्या तयारीचा आढावा घेतला. हे अॅप येत्या काही आठवड्यांत लाँच केले जाऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या सुपर अॅपचा वापर शेतकऱ्यांना पीक उत्पादन आणि तंत्रज्ञान तसेच काढणीनंतरच्या समस्या, शेतमालाच्या विपणन प्रशिक्षणासाठीही केला जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सध्याचे अॅप्स जे सुपर अॅपसह एकत्रित केले जाणार आहेत ते आयसीएआर, राज्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर विभागांसारख्या अनेक सरकारी संस्थांनी विकसित केले आहेत.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.