[ad_1]
मुंबई : कोविडबाधित रुग्णांची घरी काळजी घेणारे किंवा ६ तासांपेक्षा जास्त संपर्कात आलेल्यांची आता कोविड चाचणी होणार आहे. यासाठी त्यांना डॉक्टरच्या चिठ्ठीची गरज भासणार नाही. त्याचबरोबर लक्षणे नसलेल्या हायरिस्क व्यक्तीची चाचणी डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय महापालिकेच्या किंवा खासगी प्रयोगशाळेत करता येणार आहे.
जोखमीच्या नसलेल्या, तसेच लक्षणे नसलेल्या कोविड बाधित व्यक्तींना घरीच क्वारंटाइन करण्यात येत आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमधे कोविडची लक्षणे दिसू लागताच त्यांना पालिकेच्या फिव्हर क्लिनीकमध्ये जावे लागत होते, अथवा त्यांना खासगी डॉक्टरची चिठ्ठी घेऊनच कोविड चाचणी करता येत होती. मात्र, आता अशा चिठ्ठीची गरज लागणार नाही.
संबंधित व्यक्तीला कोविड बाधित व्यक्तीचे नाव लिहून स्वयंघोषणा पत्र द्यायचे आहे. या पत्राच्या आधारावर खासगी प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता येणार आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. घरी असलेल्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती अथवा बाधित व्यक्तीच्या ६ तासांपेक्षा जास्त काळ संपर्कात असलेल्या व्यक्तीला अशाप्रकारे चाचणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
महापालिकेने तयार केलेल्या चाचण्यांच्या निकषावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यात ज्या व्यक्तीत लक्षणे दिसतात त्याला चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी कशाला हवी, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नांना महापालिकेने आता पूर्णविराम दिला आहे.

[ad_2]
Source link