[ad_1]
सांगोला, जि. सोलापूर : सांगोला तालुक्याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर झाली आहे. या अंदाजानुसार तालुक्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दिसून आली आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजरअंदाज वाढला आहे. आता सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा सांगोला तालुक्यात मान्सूनच्या पहिल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गेल्या २० ते २५ वर्षात पडला नाही, एवढा पाऊस तालुक्यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनके गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सांगोला तालुक्याला जबर फटका दिल्याने अंतिम पैसेवारी ही ४५ पैसे आली होती. सध्या सांगोला तालुक्यात पिकांची स्थिती उत्तम असल्याने चित्र बदलले आहे.
यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असला तरी नुकसानीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्याचा नजर अंदाज हा ५० पैशापेक्षा जास्त आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात सुधारित पैसेवारी किती येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, सुधारित पैसेवारी बहुतांश वेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात सहसा बदल होत नाहीत. आता ३१ ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी, तर ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे, यावरच पुढे शासनाची धोरणे आणि त्याचा लाभ मिळू शकतो.
पावसाने नुकसान, उत्पादनात होणार घट
पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त असली, तरी सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हजारो हेक्टरवरील पिके अद्यापही कापणीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतांमध्ये पाणी असल्याने पिके काढणीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नजरअंदाज पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.

[ad_2]
Source link