[ad_1]
सातारा ः जिल्ह्यात खतसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण ३५ हजार २२४ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर खताच्या किंमतही वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरीप हंगामावर न होण्यासाठी हंगामाअगोदर खतांचा साठा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामापासूनच खते, बियाणे कमी पडू नये, या साठी कृषी विभागाने नियोजन केले होते. यामुळे सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खताचा साठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ३५ हजार २२४ टन खते उपलब्ध आहेत. खतामध्ये सर्वाधिक युरिया १३ हजार १७१ टन, डीएपी ४ हजार १३१, एमओपी एक हजार १३, एसएसपीचे सहा हजार ५६७, एन पी के एस हे १० हजार २६७, तर कंपोस्ट खते ७३ मेट्रिक टन उपलब्ध आहेत. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. या उसासाठी खताची मोठी मागणी राहील. खरिपासाठी कृषी विभागास बियाणे, खतांची मागणी करावी लागेल.
खत दरवाढीची भीती
रशिया-युक्रेन युद्धाचा दुष्परिणाम हळूहळू भारतात दिसू लागला आहे. मागील काही दिवसांत तेलाच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. आता इंधन व खतांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया आणि बेलारूसमधून भारतात पोटॅश व फॉस्फरसच्या कच्चा मालाची आयात केली जाते. मात्र, युद्ध सुरू झाल्यानंतर मालाच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने पोटॅश व फॉस्फरयुक्त खतांचे दर वाढणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

[ad_2]
Source link