[ad_1]
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीचे दर स्थिर राहिले. तर गवार, भेंडीच्या दरातील तेजी पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची रोज २० ते ३० क्विंटल आणि काकडीची २० ते ५० क्विंटल अशी अशी आवक राहिली. तर गवार आणि भेंडीची प्रत्येकी ५ ते १५ क्विंटल अशी आवक राहिली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गाजर आणि काकडीला चांगला उठाव असल्यानं दर पुन्हा स्थिर राहिले. तर गवार आणि भेंडीची आवक जेमतेम असल्यानं दरातील तेजी पुन्हा टिकू राहिल्याचे चित्र राहिलं. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये, काकडीला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला.
गवारला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये आणि भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला. लिंबूची आवकही तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दर तेजीत राहिले. लिंबूला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि ५५०० रुपये असा दर मिळाला. भाज्यांमध्ये किंचित चढ-उतार झाला. विशेषतः कोथिंबिरीला बऱ्यापैकी उठाव मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ६०० रुपये, शेपूला २०० ते ३०० रुपये आणि मेथीला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.