[ad_1]
सोलापूर ः शेतीपंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीपोटी सरसकट डीपीतून वीज तोडू नका, ज्यांनी बिल भरले आहे, त्यांची वीज सुरू करा, यासह हप्त्याहप्त्याने बिल भरण्यास मुदत द्या, या मागणीसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात सोमवारी (ता.७) दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱयांसह माजी आमदार माने यांनी जुनी मिल कंपाउंडमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. त्यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या दालनात त्यांनी मागण्या मांडत थेट ठिय्या मारला. काही थकबाकीदारांमुळे पूर्ण ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा तोडू नये, शेतकऱ्यांची थकबाकी टप्प्याटप्प्याने घ्यावी, विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
थकबाकीदार शेतकऱ्यांना पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत रक्कम भरण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच एका ट्रान्स्फॉर्मरवर १२ ते १५ कनेक्शन असतील आणि काहींनी थकबाकी भरली नाही, म्हणून पूर्ण ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा तोडणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणे होते. पण अधीक्षक अभियंता सांगळे हे ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे तब्बल पाच ते सहा तास तिथेच माजी आमदार माने यांनी ठिय्या दिला. शेवटी टप्प्याटप्प्याने बिल भरण्यास आणि सरसकट वीजतोडणी न तोडता थकबाकीदाराचीच वीज तोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.