शेती

कापूस खते आणि पीक संजीवके

आपण फवारणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खतांचा आणि संजीवकांचा वापर करताना नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया.

फवारणीतुन कोणती खते देणार –

कापुस पिकांत फुलपाती लागण्यापासुन तर बोंड पक्व होईपर्यंत पालाश अन्नद्रव्याची गरज जास्त असते. हे अन्नद्रव्य कापुस पिकांस फवारणीद्वारे कापुस पिकाच्या बोंड पक्वतेच्या काळात देणे जास्त फायदेशिर ठरते. पालाश युक्त खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास कापुस पिकाच्या बोंडांचे वजन वाढते, धाग्याची जाडी वाढते, तसेच कापुस पिकाची पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी हाते. खालिल प्रमाणे कोरडवाहु तसेच बागायती कापुस वाणांस फवारणीतुन खते द्यावीत.

कापुस पिकांतील संजिवकांची वापर

  • कापुस पिकांत ६- बी.ए., क्लोरमॅक्वेट क्लोराईड या दोन संजिवकांचा वापर करणे फायदेशिर ठरते.
  • क्लोरमॅक्वेट क्लोराईड (लिहोसिन वै. नावांनी उपलब्ध) –
  • हे एक वाढ रोधक आहे. याच्या वापरानंतर कापुस पिकाची वाढ काही काळापुरता थांबवली जाते, ज्यामुळे कापुस पिकांतील सायटोकायनिन ची निर्मिती वाढीस लागुन, फुलधारणा जास्त प्रमाणात होते.

६ – बी. ए. – (अरो वै . नावांनी उपलब्ध ) –

हे एक सायटोकायनिन असुन, याच्या वापराने पिकाची वाढ तर थांबतेच मात्र त्यासोबत फुलांची निर्मीती देखिल वाढते, तसेच धागा लांब आणि जाड होण्यास देखिल मदत मिळते. ६ –बी.ए. चा वापर हा १० पीपीएम (१ ग्रॅम ६ –बी.ए. १०० मिली सॉलव्हंट मध्ये विरघळवुन हे द्रावण १०० लिटर पाण्यातुन फवारणे) या प्रमाणात फुल धारणा होण्याच्या ३ ते ७ दिवस आधी करावा. हा काळ कापुस पिकाच्या लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी असतो.

कापुस पिकातील पुर्न बहार (फरदडव्यवस्थापन –

कापुस पिकांत फरदड चांगली येण्यासाठी खालिल प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच कापुस पिकांस वर फवारणीसाठी जी खते शिफारस केली आहेत त्यांची फवारणी घ्यावी.
पहिल्या वेचणीनंतर दिवसनत्रस्फुरदपालाशमॅग्नेशियम सल्फेटकॅल्शियम नायट्रेटसल्फरझिंक सल्फेटफेरस सल्फेटमँगनिज सल्फेट
५-१० दिवस१०२५२०००००००००००००
३०-३५ दिवस२०००२०१०१०१०००००
एकुण३०००४०१०१०१०००००

कापुस पिकातील पिक फेरपालट

कापुस पिकांत येणा-या विविध रोग व सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासुन पिकाचे संरक्षण करित असतांना पिकाची फेरपालट करणे देखिल फायदेशिर ठरते. कापुस पिकातील पिक फेरपालट करतांना त्यापासुन कोणत्या पिकापासुन काय फायदा मिळेल ते खालिल तक्त्यात दर्शविले आहे. खालिल तत्क्यात कापुस पिकावर हल्ला करणारे सुत्रकृमी आणि मुळांना होणारे रोग यांच्या विरुद्ध पिक फेर पालट केल्याने कापुस पिकांस काय फायदा होईल ते दिलेले आहे.
फेरपालट साठी पिकसुत्रकृमीव्हर्टिसिलियम विल्टरायझोक्टोनिया आणि पिथियमफ्युजॅरियम विल्ट
तृणधान्य आणि उन्हाळ्यात शेत मोकळे ठेवणेसमाधानकारकसमाधानकारकसमाधानकारककाही प्रमाणात परिणाम
हिवाळ्यातील तृणधान्यकाही प्रमाणात परिणामकाही प्रमाणात परिणामकाही प्रमाणात परिणामकाही प्रमाणात परिणाम
चवळी लागवडसमाधानकारकसमाधानकारकअल्प प्रमाणात परिणामकाही प्रमाणात परिणाम
मकासमाधानकारकसमाधामकारकसमाधानकारककाही प्रमाणात परिणाम
ज्वारीसमाधानकारकसमाधानकारकसमाधामकारककाही प्रमाणात परिणाम
कांदा – लसुणअल्प प्रमाणात परिणामसमाधानकारकअल्प प्रमाणात परिणामकाही प्रमाणात परिणाम
सौजन्य – आनंद जाधव
Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close