शेती

कापूस ख़त व्यवस्थापन

भारतात कापुस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड जी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते, आणि बागायती लागवड केली जाते. भारतातील कापुस लागवडीचा हंगाम हा फेब्रुवारी ते जुलै असा आहे. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ हि पुर्ण पणे पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. वाणाचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणे करुन चांगला पाउस राहील त्या काळात कापसांस फुले येवुन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर बोंडांची पक्वता मिळेल. कापूस या पिकासाठी विविध टप्प्यावर खतांचा वापर केला जातो. विविध पद्धतींद्वारे खत व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे फायद्याचे ठरेल.

कापुस पिकातील उगवाणीपुर्वीचे तणनियंत्रण :

कोरडवाहु वाण लागवड करण्यापुर्वी, शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे.  एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि कापुस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.

कोरडवाहु कापुस लागवडीसाठी रासायनिकखतांची मात्रा – (प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवसनत्रस्फुरदपालाशमॅग्नेशियम सल्फेटकॅल्शियम नायट्रेटसल्फरझिंक सल्फेटफेरस सल्फेटमँगनिज सल्फेट
५-१० दिवस२०२५२०००००००००००००
३०-३५ दिवस३०२५५०१०१०१०१०
एकुण५०५०७०१०१०१०१०
बागायती कापुस पिकाची लागवड बहुतांश करुन ड्रिप इरिगेशन वर केली जाते, त्यामुळे या पिकांस रासायनिक खतांची मात्रा ड्रिप द्वारे देणे शक्य होते, या पिकांस खालिल प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. प्रमाण किलो प्रती एकर

बागायती कापुस पिकासाठी आदर्श खतव्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवसनत्रस्फुरदपालाशमॅग्नेशियम सल्फेटकॅल्शियम नायट्रेटसल्फरझिंक सल्फेटफेरस सल्फेटमँगनिज सल्फेट
५-१० दिवस२०२५२५००००००००००००
३०-३५ दिवस२०२५२५१०१०१०१०
६०-६५ दिवस२०००२५१०००००००००००
९० – ९५ दिवस००००२५१०००००१०००
एकुण८०५०१००३०१०२०१५

कापुस पिकांत जैविक खतांचा वापर :

कापुस पिकांत स्फुरद विरघळवणारे जीवाणु, तसेच पालाश प्रवाहीत करणारे जीवाणु यांचा वापर करणे फायदेशिर ठरते.
सौजन्य – आनंद जाधव
Show More
Ads

Related Articles

2 Comments

 1. Hi,

  How are you doing? I aim to provide you a high quality, free of cost guest post article for your amazing website.

  I can send you some really great topic ideas for this purpose which would be relevant to your website niche for sure.

  If my topic ideas happen to appeal you, I’ll send over the article. I would just need a backlink in return of the article. The backlink needs to be within the body of the article.

  Please let me know your response to this, if I shall send topic ideas?

  Looking forward.

  Regards,

  Umer Ishfaq

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close