कृषी सेवाचालु घडामोडीपिक व्यवस्थापनशासनाच्या योजना

कापूस दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; पाहा…सध्या काय आहे कापसाचा दर?

आम्ही कास्तकार, अकोला: कापसाच्या दरात आणखी २०० ते ३०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता कापूस उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या बाजारात कापसाला ६ हजार ५०० ते ६ हजार ७५० रुपये इतका दर मिळत आहे. 

फेब्रुवारी महिन्यात दर कोसळल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, मार्च महिन्यात या दरात सुधारणा होऊन, प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. तर आता पुन्हा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. कापसाचा दर सध्या ६ हजार ५०० ते ६ हजार ७५० रुपयांपर्यंत पोहचला आहे. 

दरम्यान, सध्या शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker