कृषी सेवाचालु घडामोडीशासनाच्या योजना

यावर्षी कृषी अभ्यासक्रमांच्या शुल्कात भरमसाठ वाढ

यावर्षी कृषी अभ्यासक्रमांच्या शुल्कात भरमसाठ वाढ

आम्ही कास्तकार, मुंबई: कृषी अभ्यासक्रमांकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मागच्या वर्षांपासून सर्वच कृषी अभ्यासक्रम ‘व्यावसायिक’ करण्यात आले आहे. तर आता यावर्षी या अभ्यासक्रमांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. बहुतांश खासगी महाविद्यालयांनी आपल्या शुल्कात तब्बल २५ ते ४० टक्के वाढ करण्यात आले असून, ते लाखो रुपयांच्या घरात गेले आहे.

बी.टेक जैव व अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयांचे शुल्क ७५ हजार निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयांचे शुल्क यावर्षी ८० हजार ते १ लाख रुपयांच्या घरात गेले आहे. बीएस्सी (अ‍ॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर), कृषी अभियांत्रिकी या विषयांचे शुल्क ४५ हजार रुपये होते. ते आता ५० ते ८० हजार रुपयांच्या घरात गेले आहे.

कृषी अभ्यासक्रम ‘व्यावसायिक’ झाल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशाबरोबरच या अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांचे शुल्कही नियमन प्राधिकरणाने निश्चत करण्याचे आदेश देण्यात आले. हे शुल्क पूर्वी महाविद्यालयांच्या संघटना निश्चित करायच्या. प्रधिकरणाने शुल्क निश्चितीनंतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होण्याऐवजी प्रत्यक्षात हा बदल संस्थांच्याच पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. मोजक्या महाविद्यालयांचेच शुल्क गेल्यावर्षीपेक्षा कमी झाले आहे. मात्र बहुतांशी महाविद्यालयांचे शुल्क वाढल्याचेच दिसत आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker