MahatmaJyotibaPhuleKarjMafiYojanaMahatmaPhuleKarjMafiYadiListकर्जमाफी

बँकसोबत आधार लिंकची मुदत संपली. आता कर्जमाफी मिळणार का? जाणून घ्या.

आम्ही कास्तकार : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बॅंक खाते “आधार’ संलग्नित असणे आवश्‍यक आहे. ज्यांचे खाते आधार संलग्नित नाही, अशांसाठी ता. 7 ही अंतिम मुदत होती. बॅंकेच्या 12 हजार 506 शेतकऱ्यांचे खाते “आधार’शी संलग्न नसल्याची माहिती समोर आली आहे. गटसचिवांनी या कामांवर बहिष्कार टाकल्याने शेतकऱ्यांचे खाते आधार कार्डाशी “लिंक’ न झाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. या कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची खाती ही आधार संलग्नित असणे अनिवार्य आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह, राष्ट्रीयकृत बॅंकांना शेतकऱ्यांची खाती आधारशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा – महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ : शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 

ही होती अंतिम मुदत 
जिल्हा बॅंकेच्या खातेदारांची खाती आधारशी जोडून त्यांच्या याद्या 7 जानेवारीपर्यंत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याद्या पाठविण्याची ता.7 जानेवारी 2019 ही अंतिम मुदत आहे. असे असताना जिल्हा बॅंकेच्या 12 हजार 506 खातेदारांची होती ही “आधार’शी संलग्नित नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गटसचिवांच्या बहिष्काराचाही या योजनेच्या अंमलबजावणीला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. या याद्या गावचावडी, तलाठी सजा, तालुका उपनिबंधक कार्यालय याठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे.

अंमलबजावणीसाठी समिती 
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी हे असून सदस्य म्हणून जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा अग्रणी बॅंकेचे प्रबंधक, सदस्य सचिव म्हणून जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे

तर आता पुढे काय होणार? कर्जमाफी मिळेल का?
तर सात जानेवारीपर्यंत आधार लिंक न केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या या गावच्या चावडीवर म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि सोबतच्या द्या आपल्याला काही दिवसानंतर लवकरच आपल्या महा ई सेवा केंद्रावर सुद्धा बघायला मिळतील तेथे जाऊन ज्या शेतकऱ्यांनी आपला बँक खाते आधार लिंक केलेले नाही त्यांचा उल्लेख असणारे आणि त्यांना पुन्हा संधी आधार लिंक साठी दिली जाणार आहे त्यामुळे कोणतेही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये.

एक नम्र विनंती
तर मित्रांनो ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पोस्टला खाली असलेला व्हाट्सअप फेसबुक  आणि सर्व सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

Show More
Ads

Pritam Sonone

Pritam Gulabrao Sonone is a Founder, CEO & Admin of Amhi Kastkar - आम्ही कास्तकार Website and YouTube Channel. He Also Founder & CEO of Digital Pritam. He is Passionate Video Creator, Blogger and By Profession He is Bachelor of Agriculture.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close