शेती

कोरोना व्हायरस: देशभरात 21 दिवस लॉकडाऊन-पंतप्रधान मोदी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 21 दिवसांकरता म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले. तसंच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

“जिथे आहात तिथेच राहा. तुमच्या घराभोवती लक्ष्मणरेषा आखून घ्या. आपल्याला घरातच राहायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक आहे. देशाच्या पंतप्रधानापासून गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्याला रोखायचं आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची आहे. आपली आताची कृती कोरोनामुळे होणारं नुकसान कमी होऊ शकतं”, असं पंतप्रधान म्हणाले.

‘जान है तो जहाँ है’ हे लक्षात ठेवा. धैर्य आणि शिस्तीने वागायची आवश्यकता. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. कठीण काळातही हॉस्पिटल प्रशासन काम करत आहे. परिसर सॅनिटाईझ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा विचार करा. पोलीस, प्रसारमाध्यम यांचा विचारा करा.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे जे आवश्यक ते आपण करत आहोत. जागतिक आरोग्य संघटना, देशभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे.

कोणत्याही अफवा आणि अंधविश्वास यांच्यावर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या सल्याविना औषध घेऊ नका. तुमची एक कृती तुमचा जीव धोक्यात टाकू शकते.

21 दिवसांचा वेळ खूप आहे. परंतु आपल्या आयुष्यासाठी ते महत्त्वाचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

  • जनता कर्फ्यूमध्ये प्रत्येक भारतीयांनी सहभाग नोंदवला. जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतीयानं यशस्वी केलं. एका दिवसाच्या जनता कर्फ्यूतून भारतानं दाखवून दिलं की, देशावर संकट येतं, मानवतेवर संकट येतं, त्यावेळी आम्ही सर्व भारतीय कसे मिळून सामना करतो.
  • जगातल्या मोठ्या मोठ्या देशांना कोरोना व्हायरसनं हतबल केलंय.
  • कोरोना व्हायरस इतक्या वेगानं पसरतोय की, सर्व तयारी केल्यानंतरही आव्हानं वाढत जातायत.
  • कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. म्हणजे, एकमेकांपासून दूर राहणं, आपल्या घरातच राहणं. कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा यापेक्षा दुसरा मार्गच नाहीय. संक्रमणाच्या साखळीला तोडावंच लागेल.
  • सोशल डिस्टन्सिंग प्रत्येक नागरिकासाठी आहे. केवळ रुग्णांसाठीच नाही. अगदी पंतप्रधानांसाठीही आहे.
  • सोशल डिस्टन्सिंगबाबत हलगर्जीपणा सुरूच राहिला, तर भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल. त्या किंमतीचा अंदाजही वर्तवता येणार नाही, इतकी मोठी किंमत असेल.

सौजन्य – bbc मराठी

Tags
Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close