वाकोद (ता. जामनेर) ः सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर मोठे संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लॉकडाउन सुरु आहे. यादरम्यान शेतकरी व शेतीशी संबंधीत सर्व कामांना यातून वगळण्यात आले असून या लॉकडाउन दरम्यान शेतकरी आपली कामे करू शकतो. तसेच पुढेही शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील; मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचना बॅंकांना देण्यात आल्या असून, पुढीत महिन्यापासून कर्ज प्रक्रिया सुरू करणार असल्याचे असे मत महाराष्ट्र कृषीमंत्री दादा भूसे यांनी “सकाळ’कडे व्यक्त केले
शेतकरी व त्यांच्या समस्या यविषयावर कविवर्य ना. धों. महानोर यांची मुलाखत “सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या संबंधात त्यांनी आपली प्रतिक्रिया “सकाळ’कडे व्यक्त केली. यावेळी कृषी मंत्री भूसे यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी देखील वार्तालाप करत त्यांना आश्वस्त केले
दरम्यान “सकाळ’ने प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांशी संवाद साधुन कविवर्य महानोर यांनी व्यक्त केलेली खंत सांगितल्या त्यावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त करत शेतकऱ्यांना आपला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी अडचण येणार नाही. तसेच खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून लागणारे बियाणे, खते, ठिबक, शेती पूरक साहित्य यांचे नियोजन झाले असून बॅंकांना देखील शेतकऱ्यांना सढळ हाताने कर्ज वाटप करुन सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कर्ज प्रक्रिया पुढील महिन्यात सुरु होईल. तसेच पिकविमा देखील केवळ कापूस पिकाचा राहिलेला असून तो देखील लवकरच वाटप करण्यात येईल असे देखील मंत्री भुसे यांनी सांगितले. शेतात देखील शेतकरी व शेत मंजूर यांनी सोशल डिस्टन्स सांभाळून कामे करू शकतात असे मत कृषी मंत्री दादा भूसे यांनी “सकाळ’कडे मांडले.
पिकांच्या नुकसानीची जाण
तसेच कविवर्य महानोरांनी व्यक्त केलेल्या खंत विषयी बोलतांना सांगितले, की त्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी मांडलेल्या समस्याबाबत सर्वच परिपूर्ण आहे; असे मी म्हणनार नाही. परंतु प्राप्त परिस्थितीत शेतकरी हिताचे नियोजन सुरु आहे. अनेक पिकांचे नुकसान देखील झाल्याचे मान्य करतो. पीएम किसानचे निधी अद्याप मिळाला नाही; याबाबात केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी देखील व्हिसीद्वारे बोलने झाले आहे.
हे पण वाचा :
- Ram Navami SMS Marathi : रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Status, Wishes, Quotes, Photos Download २१ एप्रिल २०२१
- उन्हाळ्याच्या शेंगदाण्यांमधून अधिक कसे मिळवायचे?
- Ram Navami 2021 : राम नवमीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Wishes, GIF & Photos Download
- दिल्लीत टाळेबंदी होताच या गोष्टींच्या किंमती वाढल्या, सर्वसामान्यांना तणाव निर्माण झाला
- पर्यावरणीय शुध्दीसाठी संभाव्य बायोमेडीएटरः ट्रायकोडर्माचे महत्त्व आणि वापर
Sir sheta jane sati ratabal kai link asel tr vidio send krab bhurav nasla tr kay kr laght aahe
Ani nemi karj barnarya kdi mlinr 50 hajar rupe