शेती

मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणा : विजय वहाडणे

कोपरगाव, जि. नगर  ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.

श्री. वहाडणे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा सन्मान करणारा, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद उपक्रम यशस्वी केला. विरोधी पक्षाचे असूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासीयांना साद घालून, देशभर दिवे उजळवून सर्व भारतीयांची एकजूट आहे, असे जगाला दाखवून दिले आणि जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट, महाराष्ट्र भाजपने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला, हेच कळत नाही. याच न्यायाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध असेच आंदोलन करायचे का? अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये?”

विशेष म्हणजे विजय वहाडणे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे चिंरजीव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नरेंद्र मोदी विचार मंचाची स्थापना करून कोपरगावची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत एकहाती जिंकली होती. त्यामुळे एकाअर्थी वहाडणे यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचेच मानले जात आहे.

News Item ID: 
820-news_story-1590239097-899
Mobile Device Headline: 
मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणा : विजय वहाडणे
Appearance Status Tags: 
Tajya News
vijay vahadne targets Bjp on political issue vijay vahadne targets Bjp on political issue
Mobile Body: 

कोपरगाव, जि. नगर  ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.

श्री. वहाडणे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा सन्मान करणारा, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद उपक्रम यशस्वी केला. विरोधी पक्षाचे असूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासीयांना साद घालून, देशभर दिवे उजळवून सर्व भारतीयांची एकजूट आहे, असे जगाला दाखवून दिले आणि जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट, महाराष्ट्र भाजपने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला, हेच कळत नाही. याच न्यायाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध असेच आंदोलन करायचे का? अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये?”

विशेष म्हणजे विजय वहाडणे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे चिंरजीव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नरेंद्र मोदी विचार मंचाची स्थापना करून कोपरगावची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत एकहाती जिंकली होती. त्यामुळे एकाअर्थी वहाडणे यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचेच मानले जात आहे.

English Headline: 
Agriculture Agricultural News vijay vahadne targets Bjp on political issue Nagar Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर कोरोना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील नरेंद्र मोदी उपक्रम शरद पवार महाराष्ट्र आंदोलन निवडणूक
Search Functional Tags: 
नगर, कोरोना, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी, उपक्रम, शरद पवार, महाराष्ट्र, आंदोलन, निवडणूक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
politics bhartiya janata party shivsens Uddhav Thackery
Meta Description: 
vijay vahadne targets Bjp on political issue
कोपरगाव, जि. नगर  ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.Source link

Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close