शेती

PM किसान योजनेचा पाचवा हप्ता जमाः अशी पहा यादी, नसेल मिळाले पैसे तर जाणून घ्या तुमच्या खात्याची स्थिती!

Photo credit https://www.dreamstime.com/

नवी दिल्लीगेले काही दिवस शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेला पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.   यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रतिवर्षी सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी देशभर नोंदणी अभियान चालविले होते. त्याचा फायदा आता लॉकडाऊनमध्ये होतो आहे.

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचा जुलै अखरेचा पाचवा हप्ता केंद्र सरकारने जमा केला आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत असून त्यांच्या खात्यात १८ हजार ७०० कोटी रुपये आले आहेत. तर राज्यात महसुल व कृषी विभागाकडून संयुक्त प्रयत्नातून अलिकडेच ३० लाख ५४ हजार ८७२ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणीकरूनही खात्यात पैसे जमा न होण्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी स्थानिक जिल्ह्यात आरडीसी अर्थात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे.

किसान सन्मान योजनेत राज्यातील बहुतेक गावांमधील खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी बाकी असल्यास किंवा आधीच्या नोंदणीत काही दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना सामुहिक केंद्र सीएससी चालकांना देण्यात आल्या आहेत. तक्रारी निवारण करण्याचे अधिकार फक्त सरकारी समितीकडे आहेत.

पीएम किसान योजनेत असे पहा आपले नाव (ऑनलाईन) – यासाठी आपण  https://www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे. आपण या योजनेसाठी अर्ज करु इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत. जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण येथे पाहू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी २०२० ची यादी तपासण्यासाठी  https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या लिंकवर आपल्याला जावे लागेल.

कशा प्रकारे मिळणार पीएम किसान योजनेचा पैसा – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २[the_ad_placement id=”in-feed”] हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते.

कसा करणार योजनेसाठी अर्ज – योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम – योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

Source link

Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close