जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा अपवाद वगळता बाजार समित्यांची मुदत संपली आहे. धरणगाव-एरंडोल, जामनेर बाजार समितीतर्फे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी या बाजार समित्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात पारोळा, जळगाव व यावल, रावेर या बाजार समित्यांना सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. जळगाव व पारोळा बाजार समितीची मुदत याच महिन्यात संपली आहे. जळगाव बाजार समितीची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपली. ही मुदत संपण्यापूर्वीच संबंधित बाजार समित्यांनी आपल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळास मुदतवाढ मिळविली आहे. या मुदतवाढीमुळे सभापती, संचालक मंडळाचे अधिकार आबाधित राहिले आहेत. शेतकरी हिताचे निर्णय, उत्पन्न वाढीचे प्रयत्न यासंबंधी संचालक निर्णय घेऊ शकतील, ठराव करू शकतील, अशी माहिती मिळाली.
मुदत संपण्यापूर्वीच काही बाजार समित्यांनी मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यात प्रथम मुदतवाढीचा प्रस्ताव पणन संचालक (पुणे) यांना सादर करण्यात आला. यानंतर पुढे कार्यवाही झाली. पणन मंत्री यांनी याबाबत अंतिम निर्णय घेतला. यासाठी सुमारे महिनाभर संचालक, प्रशासनाला यासाठी प्रयत्न करावे लागले.
रावेर येथील बाजार समितीला गुरुवारीच (ता.१७) मुदतवाढ मिळाली. सभापती नीळकंठ चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली होती.
मुदत संपलेल्या बाजार समित्या अधिक
जिल्ह्यात मुदत संपलेल्या बाजार समित्यांची संख्या अधिक आहे. सहा महिन्यांची मुदतवाढ शासन देत आहे. परंतु, पुढे कोरोनाचे संकट कायम राहिले, तर ही मुदतवाढ वाढविण्यासंबंधी मागणीदेखील संचालकांकडून करण्यात आली आहे.