नांदेड ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खाती आधारलिंक झाली आहेत. आधार लिंक झालेल्या एक लाख ५७ हजार २७० शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १११ कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील ५६ हजार २२१ शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफ करून सर्वाधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले. यात शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर, डाटा अपलोडचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज आहे. परंतु, शासनाने यानंतर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चालू खातेदारांनाही प्रोत्साहन योजनेत वाढ केल्याने कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.
दोन लाख १४ हजार ४९१ खाती पात्र
जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक करण्याचे काम झाले आहे. यातील एक लाख ९७ हजार १४१ खात्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. पोर्टलवर आजपर्यंत एक लाख ८४ हजार ८४२ कर्ज खाती प्रसिद्ध झाली आहेत. तर, एक लाख ७४ हजार ६१४ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे.
आधार लिंक झालेल्या खात्यापैकी एक लाख ५८ हजार २७० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर एक हजार ११० कोटी ८६ लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या सोबतच अद्याप पात्र खात्यांपैकी ५६ हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.