पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र, उन्हाळ कांद्याची वाढलेली सड, नवीन कांद्याच्या उत्पादनाला होणारा उशीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आगाप कांद्याचे पावसामुळे ४० टक्क्यांपर्यंत झालेले नुकसान, शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी सावध चाल आणि देशांतर्गत असणाऱ्या मागणीमुळे निर्यांतबंदीनंतरही कांदा भाव खाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कांदा दर प्रति किलोला ५० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कमाल ४५९० रुपये दर मिळाला. तर सर्वांत किमान दर प्रतिक्विंटल २०० रुपये सिन्नर बाजार समितीत मिळाला. निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक होण्यास साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख आडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांकडे जुना कांदा अत्यल्प शिल्लक आहे. त्यामुळे निर्यातबंदी करूनही दक्षिण भारतातून मागणी असल्याने दहा किलोला २५० ते ३०० रुपये दर आहेत. सध्या महाराष्ट्रातच कांदा कमी असल्याने परराज्यातून आवकेची शक्यता होती. मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही पावसाने कांदा भिजला आणि नवी लागवड कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.
पणन मंडळाच्या अंदाजानुसार आगामी हंगामातील खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबण्याची शक्यता असून, सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ग्राहकांना साठवणुकीतील उन्हाळी कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र आता साठवणुकीतील कांदा निसर्ग चक्रीवादळात भिजला आणि काही शिल्लक कांदा गेल्या महिन्यात विक्री झाल्याने आता अत्यल्प कांदा शिल्लक आहे. तर काही प्रमाणात कांदा निर्यात झाला आहे. त्यामुळे आता कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचे दर चढे राहतील.
प्रतिक्रिया
उन्हाळ कांद्याची सड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यात खरीप लागवडी खराब होण्याचेही प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पुढील चित्र अवघड वाटते. म्हणून दरात सुधारणा कायम आहे.
– मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव
माझ्याकडे सध्या ३०० गोणी कांदा चाळीत शिल्लक आहे. रविवारी (ता.२०) जुन्नर बाजार समितीमध्ये दहा किलोला ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. निर्यातबंदीतही हे दर समाधानकारक आहेत. नवीन कांदा येई पर्यंत हे दर दोन महिने असेच राहतील असा अंदाज आहे.
– बाळकृष्ण वर्पे, शेतकरी, धामणखेल, ता. जुन्नर, जि.पुणे
उन्हाळ कांदा दरात सुधारणा असली तरी ७० टक्के कांदा कमी दरात विकला गेला. त्यात उरलेल्या कांद्याचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बरोबरी होईल, अधिक मिळेल असे काही चित्र नाही.
– विजय पगार, कांदा उत्पादक, कळवण, जि. नाशिक