नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली. तसेच सरकारने आधी शेतकऱ्यांच्या पायावर आणि आता त्यांच्या हृदयावर कुऱ्हाडीचे घाव घातले असल्याचा हल्ला चढविला.
संसदेत गदारोळात मंजूर झालेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरुद्ध विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने रान उठविले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी स्वपक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे कायदे लागू न करण्याचा आदेशवजा सल्लाही दिला आहे. या कायद्यांच्या निमित्ताने पंजाबमध्ये वातावरण पेटले असताना मोदी सरकारच्या कोंडीसाठी राहुल गांधी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राहुल गांधींची सभा घेण्याची चाचपणीही काँग्रेसने चालविल्याचे कळते. राहुल गांधींनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधून या कायद्यांच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्यांचा ठामपणे विरोध केला असता, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. मोदी सरकारला ही गोष्ट कळणार नाही कारण हे लोक इंग्रजांसोबत उभे होते, अशा शब्दांत राहुल गांधींनी चिमटा काढला. हे कायदे नोटाबंदी, जीएसटीनंतरचा आणखी एक वार असल्याचा टोला लगावताना राहुल म्हणाले, की नोटबंदी, जीएसटीमध्ये आणि या नव्या कायद्यांमध्ये काहीही फरक नाही. सरकारने आधी पायावर कुऱ्हाड मारली होती. आता थेट हृदयावर घाव घातला आहे.
गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन
पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. किसान मजदूर संघर्ष समितीतर्फे रेल रोको आंदोलन सुरू झाले असून काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) देशव्यापी निदर्शनांद्वारे केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, या कायद्यांना काँग्रेसशासित राज्ये न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.