अमरावती : मूग, उ़डीद खरेदीला सुरुवात व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर आता कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ ची पूर्वतयारीही शासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातही कापूस खरेदीच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
महाराष्ट्रात कृषी खात्याच्या अंदाजानुसार सन २०२०-२१ हंगामामध्ये ४२,०७ लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात ४५० लाख क्विंटल कापूस (९०० लाख गाठी) उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून शासनाकडून भारतीय कपास महामंडळ (सीसीआय), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस खरेदीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाची परिस्थिती असतानाही पणन माहासंघाने राज्यात गत १० वर्षांतील विक्रमी कापसाची खरेदी केली. अमरावती जिल्ह्यातही खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदीद्वारे मोठी कापूस खरेदी झाली. येत्या हंगामातही योग्य नियोजन करावे, असे निर्देश अॕड. ठाकूर यांनी दिले. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करावे. प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान एक ग्रेडर असावा.
कापूस खरेदी पूर्वीच कृषि विभागामार्फत आवश्यक ते मुनष्यबळ ग्रेडर म्हणून द्यावे. त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावे. साठवणुकीची व्यवस्था, गोदाम, शेड, ताडपत्रीची व्यवस्था करावी, अशा सूचनाही ॲड. ठाकूर यांनी दिल्या. बाजार समितीच्या स्तरावर शेतकरी निहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावा. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना ठिकाण व वेळ संदेशाद्वारे पाठवा, आदी सूचनाही देण्यात आल्या.