अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री स्वर्गीय पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतील शेती आणि शेतकरी विकास साध्य करण्यासाठी कृषी शिक्षण, संशोधन, कृषी विस्तार तथा बिजोत्पादन आदी प्रमुख उद्दिष्टांची पूर्तीकडे भरीव कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डाॅ. विलास भाले यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मंगळवारी (ता. २०) ५१ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. भाले बोलत होते. दरवर्षी यानिमित्ताने तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवार फेरीचे आयोजन केले जाते. यंदा कोविड १९ मुळे औपचारिक स्वरूपात एक दिवसीय शिवार फेरीचे आयोजित करण्यात आले होते. तर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्राच्या ठिकाणी एक दिवसीय शिवार फेरी घेण्यात आली.
यंदा प्रथम नोंदणी करणाऱ्या महिला शेतकरी सरस्वतीताई इंगळे (रा. गोरेगाव) यांच्या हस्ते फित कापून शिवार फेरीचे उद्घाटन झाले. विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. विलास भाले हे अध्यक्षस्थानी होते. आमदार अमोल मिटकरी, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर उपस्थित होते. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा पूजन करून शिवार फेरीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
सेंद्रिय शेती विकास प्रकल्प, कापूस संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, मिरची तथा भाजीपाला संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती विकास केंद्र, फळसंशोधन केंद्र, यंत्रे तथा अवजारे विभाग तथा पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाला शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दत्तक ग्राम कौलखेड गोमासे, गोरेगाव, सिंदखेड, भौरद, म्हातोडी आदी गावातील प्रत्येकी दहा शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात शिवार फेरीसाठी सहभागी करून घेण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविकात डॉ. मानकर यांनी विद्यापीठाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विस्तार उपक्रमांचा आढावा घेतला.
आमदार मिटकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विदर्भासाठी मानबिंदू असून विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनदरबारी प्रलंबित विविध धोरणात्मक प्रस्तावांना यथाशिघ्र मान्यता मिळण्यासाठी तसेच विदर्भातील शेती आणि शेतकरी हितासाठी या विद्यापीठाचे सक्षमीकरण होण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य कृष्णा अंधारे, प्रयोगशील शेतकरी मनोज तायडे, नामदेव अढाऊ यांनी सुद्धा सहभाग नोंदविला.