सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीजचा (एलएसडी) प्रादुर्भाव झाला आहे. हा आजार नवीन असल्याने शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही. या आजारामुळे दुभती जनावरे संकटात सापडली आहेत.
खिलारी जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढ्यासाठी जत तालुका प्रसिद्ध आहे. येथील भूमिहीन शेतमजूर, ऊसतोड मजूर शेळी पालन करतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या ५ लाख ५९ हजार १०१ आहे. तालुक्यातील अचकनहळ्ळी डफळापूर, बनाळी, आवंढी, शेगाव, रामपूर, करजगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी, उमदी या गावांमधील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. सात गावांतील १३ जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पशुपालक धास्तावला आहे.
दरम्यान, उमदी येथील शेतकऱ्याकडील बैलाच्या अंगावर गाठी उठल्या आहेत. पाय सुजला आहे. बेंबीच्या खाली गाठ आली आहे. ताप येणे,डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत. बाधित गावांत लसीकरण सुरू केले आहे. गोचीड नियंत्रणासाठीची औषधे, लस मागविली आहे. आजारी जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी बांधावीत. पशुधनामध्ये लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभागाने केले आहे.
प्रतिक्रिया
जत तालुक्यातील सात गावांतील १३ जनावरांमध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जनावरांची तपासणी करून त्यांना लस देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
– डॉ. एस. एस. बेडक्याळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, सांगली.
—
लंम्पी आजार नवीन असल्याने लवकर समजत नाही. जनावरांना ताप येणे, डोळे, नाकातून स्राव येणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत. हा आजार वेगाने पसरणार असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून प्रभावी उपाय योजनांची गरज आहे.
– मलप्पा बगले, शेतकरी, उमदी, जि. सांगली.