उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल. मदतीबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. २१) उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
तत्पूर्वी धाराशिव येथील दौऱ्यात शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री म्हणाले की, आज जी परिस्थिती आहे ही भयानक आहे. असं नाही की आपण संकटाचा सामना केला नाही किंवा संकट पाहिले नाही. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली. त्यानंतर चक्रीवादळ व पावसाने होत्याच नव्हतं होऊन गेल. आपल्याला सरकारकडून मोठ्या अपेक्षा असल्याची आपल्याला कल्पना आहे. आपण नुसती घोषणा करणार नाही. जे बोलतो ते मी करतो म्हणजे करू शकत नाही ते आपण बोलणार नाही. नुसतं बरं वाटावं टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला, आधार द्यायला आलेलो आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.