अमरावती: संत्रा निर्यातीला चालना मिळावी याकरिता `सिट्रस नेट`वर नोंदणीसाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याअंतर्गत २१ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्याकडे सादर केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने संत्रा निर्यातीला चालना मिळावी याकरिता `सिट्रस नेट` हा गेटवे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांचा या गेटवेला अल्प प्रतिसाद असल्यामुळे गेल्या वर्षभरात केवळ दोनशे शेतकऱ्यांचीच नोंदणी यावर होऊ शकली. त्यामुळे नोंदणीला चालना मिळावी याकरिता ‘अपेडा’चे उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले.
कृषी विभागाकडून देखील या संदर्भाने जाणीव जागृती केली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी रियाज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष संत्रा निर्यातदार ताज खान मजने खान यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर कंपनीच्या २१ भागधारकांचे `सिट्रस नेट`वरील नोंदणीचे प्रस्ताव विजय चवाळे यांना सादर करण्यात आले.
यावेळी श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जीचकार, अनिल लेकुरवाळे, सुधाकर बेले, कयूम भाई, एकनाथ जिचकार, अनिल काळे, राजाभाऊ कराळे, सुशील मोहोळ, भुराभाई, मंगेश सरोदे, नंदू कावे, हितेश खेरडे उपस्थित होते.
ही कागदपत्रे आवश्यक
सिट्रस नेटवर नोंदणी करिता सातबारा, शेताचा सीमादर्शक नकाशा, आधार कार्डची झेरॉक्स अशा कागदपत्रांची गरज राहते.