सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबाऱ्याची अट घातली आहे; मात्र मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची ऑनलाइन सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी सुविधी नाही. त्यामुळे पिकांची नोंद करता येत नाही. केवळ मुख्य पिकांचीच नोंद होत आहे. त्यामुळे सोयाबीन हमीभावाने विकणे कठीण झाले आहे.
शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली; मात्र पिकांची नोंद असलेला सातबारा असणे आवश्यक असा नियम लागू केला. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जून, जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड केली जाते. त्या नंतर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि सातबाऱ्यावर पिकांची नोंद करण्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते.
पिकांची नोंद करण्यासाठी आजही शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागते आहे. हस्तलिखत सातबारा बंद करण्यात आले आहेत. सर्व सातबारा ऑनलाइन पध्दतीने सुरु केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ऑनलाइन सातबाऱ्यांवर पिकांची नोंद असेल, तरच हा सातबारा उपयोगी ठरेल.
ऑनलाइन सातबाऱ्यावर पिकाची नोंद केली जाते. परंतु, या पध्दतीत एक पीक नोंदवले जाऊ शकते. दुबार पीक तसेच मुख्य पिकातील आंतरपीक नोंदविण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मुख्य पिकातील आंतरपीकाची नोंद करायची असेल, तर त्यासाठी एक एकर क्षेत्रापैकी अर्धा एकर ऊस आणि अर्धा एकर सोयाबीन अशी नोंद करावी लागणार. याचा अर्थ शेतकऱ्यांने एक एकर उसाची लागवड केली, तर सातबाऱ्यावर अर्धा एकरच ऊस नोंद होणार आहे. म्हणजे शेतीसाठी कर्ज हवे असल्यास पिकाचे क्षेत्र कमी आहे, हे कारण पुढे देऊन कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करतील.
पीकपाहणी नोंद कार्यालयातच बसून
ऑगस्ट महिन्यापासून पिकाची नोंद करण्यास सुरवात होते. तलाठ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, असा नियम आहे; मात्र तलाठी शेतातच जात नाहीत. शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती अंदाजे घेऊन कार्यालयातच पिकाची नोंद केली जाते. यामुळे सातबारात किती टक्के पिकांची नोंद खरी असते, असाही प्रश्न आहे.
आंतरपिकांची नोंद व्हावी
मुख्य पिकातील आंतर पीक घेऊन शेतकरी आर्थिक सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच शासनाने सोयाबीन, मूग, उडीद पिकासह अन्य पिकांना हमीभाव दिला आहे. त्याची विक्री करायची असेल, तर सातबाऱ्यावर पिकाची नोंद महत्वाची आहे. परंतु, ऑनलाइन सातबाऱ्यात आंतर पिकाची नोंद करता येत नाही. त्यामुळे या सातबाऱ्यावर आंतर पिकाची नोंद व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करते. परंतु, सातबाऱ्यावर आंतरपिकाची नोंद नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. ऑनलाइन साताबाऱ्यावर आंतरपिक आणि दुपार पिकाची नोंद होत नसल्याने हा नियम मारक ठरणारा आहे.
– सुभाष वडेर, ब्रह्मनाळ, ता. पलूस