अमरावती ः या वर्षी पावसाची संततधार सुरू होती. त्यासोबतच मॉन्सूनच्या कालावधीत देखील पावसाने सरासरी ओलांडली. यामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. जिल्ह्यात या वर्षी १ लाख ७७ हजार ८५२ हेक्टर रब्बी लागवड क्षेत्र राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.
या वर्षी खरीप पिकांना पावसाची संततधार, ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाचा फटका बसला. मूग, उडीद आधीच उद्ध्वस्त झाले. त्यानंतरच्या कालावधीत सोयाबीन, कपाशीदेखील हातची गेली. आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांकडून लागून आहेत. गेल्या तीन वर्षांत रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ३३ हजार ५४५ हेक्टर राहिले आहे. त्यात यंदा ३५ ते ४० हजार हेक्टर वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याकरिता ३५ हजार क्विंटल बियाणे सार्वजनिक, तर ६३७१९ क्विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून असे एकूण ९८,७१९ क्विंटल बियाणे लागणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ७८९ क्विंटल बियाण्यांचाच पुरवठा झाला आहे. याशिवाय ३२ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा ‘महाबीज’द्वारे होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात १,२३,००० मेट्रिक टन खताचे नियोजन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत १९,४९२ मेट्रिक टन खरिपातील खताचा साठा शिल्लक आहे.