नगर ः कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच दहा, वीस, तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी (ता.६) आंदोलनाचा तिसरा टप्पा होता.
आंदोलनात राज्यभरातील चारही विद्यापीठातील सुमारे साडेसात हजारापेक्षा अधिक कर्मचारी आणि सामूहिक रजा आंदोलन केले आजच्या आंदोलनात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सहभागी झाले होते. सोमवारपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती विद्यापीठांतून देण्यात आली.
सर्व विद्यापीठांतील मुख्यालयात येऊन कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत त्या-त्या विभागातील कुलसचिव यांना मागण्याचे निवेदन दिले. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये गो संशोधन प्रकल्प शेळी संशोधन प्रकल्प, मेंढी संशोधन प्रकल्प सुरक्षा सेवा, वैद्यकीय सेवा, पाणी व्यवस्था आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. मात्र शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ही राजा आंदोलनात सहभागी झाले. शुक्रवारी आंदोलनाचा ११ वा दिवस होता.