नांदेड : केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे कायदे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासोबतच अपप्रचार करून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. त्यांच्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
नवामोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (ता. १४) माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी चव्हाण बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले, की भाजप सरकार शेतकरी, कामगार व सर्व सामान्यांच्या विरोधात धोरण राबवीत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी व कामगार कायदे शेतकरी कामगारांना देशोधडीला लावणारे आहेत. तरीही भाजपकडून अपप्रचार पसरवत जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अशा भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जि.प.च्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, उपमहापौर मसूद खान, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, मनपा सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, काँग्रेसचे सरचिटणीस संजय लहानकर, कोशाध्यक्ष विजय येवनकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नागरिकांनी काळजी घ्यावी
अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सोशल डिस्टन्सिग व मास्कचा वापर करावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सहभाग व्हावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.