• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Saturday, January 23, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • सर्व बातम्या
  • आजचा हवामान अंदाज
  • WhatsApp Group जॉईन करा
  • शेतीविषयक योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना
    • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड योजना
  • मुख्यपृष्ठ
  • सर्व बातम्या
  • आजचा हवामान अंदाज
  • WhatsApp Group जॉईन करा
  • शेतीविषयक योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना
    • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड योजना
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

केळीची मागणी कायम, दर टिकून 

Admin by Admin
26 November 2020
in News
2 min read
0

जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले. या महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

दर्जेदार केळीला ऑन (जादा) दरही खरेदीदारांनी दिले होते. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा भागात सुरू आहे. केळीचे आगार असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल भागांत आगाप लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू झालेली नाही. अपवादाने या भागात काढणी सुरू आहे. यातच यंदा जळगाव, चोपडा भागांत कांदेबाग केळीची काढणी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. गुजरातमधून केळीचा पुरवठा फारसा उत्तर भारतात सुरू नाही. 

गुजरातमधील केळी उत्तरेकडील खरेदीदारांना परवडते. रस्त्यांचे जाळे व इतर बाबींमुळे वाहतूक खर्चही उत्तरेकडील खरेदीदारांना गुजरातची केळी मागविताना कमी पडतो. परंतु गुजरातमधील केळीची काढणी जुलैमध्येच संपली आहे. गुजरातमधील केळीची आवक डिसेंबरमध्ये सुरू होईल. तसेच सध्या दाक्षिणात्य भागातील आंध्र प्रदेशातूनही केळीचा फारसा पुरवठा उत्तरेकडे सुरू नाही. यामुळे केळीचे दर खानदेशात टिकून राहिले. अनेकदा नोव्हेंबरमध्ये केळीचे दर घसरत होते. परंतु यंदा दर घसरलेले नाहीत. किंवा काढणीसंबंधीदेखील शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.

केळी काढणीत घट
दिल्ली, काश्‍मीर, पंजाब, उत्तर प्रदेशातील खरेदीदार एजंटच्या माध्यमातून रस्तेमार्गे केळीचा पुरवठा करून घेत आहेत. सध्या जळगाव, चोपडा, पाचोरा, यावल भागात कांदेबाग केळीची काढणी कमी झाली आहे. डिसेंबरच्या मध्यानंतर काढणी आणखी कमी होईल. सध्या प्रतिदिन १७० ते १७५ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. यामुळे तेथेही केळीचा पुरवठा कमी झाल्याची माहिती मिळाली. सध्या केळीला किमान ६५० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
 
News Item ID: 
820-news_story-1606322301-awsecm-288
Mobile Device Headline: 
केळीची मागणी कायम, दर टिकून 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
banana banana
Mobile Body: 

जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले. या महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

दर्जेदार केळीला ऑन (जादा) दरही खरेदीदारांनी दिले होते. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा भागात सुरू आहे. केळीचे आगार असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल भागांत आगाप लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू झालेली नाही. अपवादाने या भागात काढणी सुरू आहे. यातच यंदा जळगाव, चोपडा भागांत कांदेबाग केळीची काढणी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. गुजरातमधून केळीचा पुरवठा फारसा उत्तर भारतात सुरू नाही. 

गुजरातमधील केळी उत्तरेकडील खरेदीदारांना परवडते. रस्त्यांचे जाळे व इतर बाबींमुळे वाहतूक खर्चही उत्तरेकडील खरेदीदारांना गुजरातची केळी मागविताना कमी पडतो. परंतु गुजरातमधील केळीची काढणी जुलैमध्येच संपली आहे. गुजरातमधील केळीची आवक डिसेंबरमध्ये सुरू होईल. तसेच सध्या दाक्षिणात्य भागातील आंध्र प्रदेशातूनही केळीचा फारसा पुरवठा उत्तरेकडे सुरू नाही. यामुळे केळीचे दर खानदेशात टिकून राहिले. अनेकदा नोव्हेंबरमध्ये केळीचे दर घसरत होते. परंतु यंदा दर घसरलेले नाहीत. किंवा काढणीसंबंधीदेखील शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.

केळी काढणीत घट
दिल्ली, काश्‍मीर, पंजाब, उत्तर प्रदेशातील खरेदीदार एजंटच्या माध्यमातून रस्तेमार्गे केळीचा पुरवठा करून घेत आहेत. सध्या जळगाव, चोपडा, पाचोरा, यावल भागात कांदेबाग केळीची काढणी कमी झाली आहे. डिसेंबरच्या मध्यानंतर काढणी आणखी कमी होईल. सध्या प्रतिदिन १७० ते १७५ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. यामुळे तेथेही केळीचा पुरवठा कमी झाल्याची माहिती मिळाली. सध्या केळीला किमान ६५० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
 
English Headline: 
agriculture news in Marathi rate of banana constant Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
केळी भारत खानदेश जळगाव रावेर मुक्ता वर्षा आंध्र प्रदेश काश्‍मीर पंजाब उत्तर प्रदेश
Search Functional Tags: 
केळी, भारत, खानदेश, जळगाव, रावेर, मुक्ता, वर्षा, आंध्र प्रदेश, काश्‍मीर, पंजाब, उत्तर प्रदेश
Twitter Publish: 
Meta Keyword: 
rate of banana constant
Meta Description: 
rate of banana constant
दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले.

Source link

READ ALSO

गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान

ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

News

गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान

23 January 2021
News

ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान

22 January 2021
News

खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना वीज द्या ः राऊत

22 January 2021
News

आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार ऑनलाइन 

22 January 2021
News

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीर

22 January 2021
News

कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲक्‍शन प्लॅन 

22 January 2021
Next Post

तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळ

गहू, हरभरा पेरणीला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान
  • ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान
  • खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना वीज द्या ः राऊत
  • आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार ऑनलाइन 
  • सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीर

Recent Comments

  • मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )
  • samukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात
  • या तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता
  • Hairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019
  • Hairstyles VIP on Payday Loans Can Solely Damage Your Credit score Rating
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.