जळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर पिकांमधील खर्च, मजुरी, नुकसान आदी समस्या लक्षात घेता खानदेशात या हंगामात ऊस लागवड सुमारे पाच हजार हेक्टरने वाढू शकते. ही लागवड शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यात अधिक वाढेल, असाही अंदाज आहे.
खानदेशात सुमारे २६ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. त्यात नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर, धुळ्यात सहा आणि जळगाव जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
खानदेशात गेल्या तीन वर्षांत तीन खासगी कारखाने सुरू झाले आहेत. यातील समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील कारखाना वेगात काम करीत आहे. या कारखान्याने गाळप क्षमता आठ हजार टन प्रतिदिनपर्यंत नेण्याची कार्यवाही यंदा हाती घेतली. १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
नंदुरबारात मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानेदेखील ऊस खरेदी करतात. तर धुळे व जळगावातही दोन खासगी कारखाने कार्यरत आहेत. मधुकर सहकारी साखर कारखाना (न्हावी., जि.जळगाव) अडचणीत आहे. तसेच चोपडा (जि.जळगाव) येथील कारखानादेखील बंद आहे. या स्थितीत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खासगी कारखाना व जळगाव येथील खासगी कारखाना कार्यरत आहे. तसेच औरंगाबाद, नाशिक व नगर जिल्ह्यातील कारखानेदेखील खरेदी करीत आहेत. यामुळे उसाची १०० टक्के तोडणी पूर्ण होते. चुकारेही गेल्या हंगामात मिळाले.
चाळीसगाव तालुक्यातही क्षेत्र वाढणार
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ऊस लागवड वाढणार आहे. यंदा या तालुक्यात व लगत पाच ते सहा हजार हेक्टरवर ऊस लागवड होईल. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टरवर ऊस लागवड होऊ शकते. धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल व मुक्ताईनगर भागातही ऊस लागवड वाढण्याचा अंदाज आहे. ही लागवड खानदेशात मिळून ३० ते ३१ हजार हेक्टरपर्यंत पोचू शकते.