देऊर, जि. धुळे : धुळे तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या ५५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी धुळे तालुक्यातील तब्बल २ हजार ४११ लाभार्थी अपात्र आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झालेली १ कोटी ५० हजार रुपये रकमेची वसुली करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त आदेशानुसार प्राप्त लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांनी नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित लाभाची रक्कम “तहसिलदार धुळे पीएम किसान” या नावाने धनादेशाद्वारे समक्ष तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपस्थित राहून रक्कम भरणा करावी, अशी माहिती तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांनी रक्कम भरणा केल्याची पोहोच पावती प्राप्त करून घ्यावी. धनादेशाच्या मागील बाजूस नाव PM-KISAN Beneficiary ID नमूद करावा. ही रक्कम तत्काळ परत न केल्यास त्यांच्या सात बारा उताऱ्यावर बोजा चढवण्यात येणार आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. केंद्र शासनाने पात्र लाभार्थीपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात कार्यवाही सुरू झाली आहे. वसुलीची नोटीस धुळे तहसील कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत. यामुळे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. गावस्तरापर्यंत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. वसुली पथके गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेणार आहेत. त्यांच्या नावांच्या यादीचे जाहीरपणे वाचन करून त्यांना घेतलेले पैसे पुन्हा भरण्याची सूचना देण्यात येणार आहे. जे लाभार्थी ती रक्कम भरणार नाहीत त्यांच्या सातबारा उताऱ्यावर तेवढ्या रकमेचा बोजा तहसील कार्यालयातर्फे तलाठी चढवणार आहे.