पुणे ः गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. तरीही लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्यांना सुरवात करतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
यंदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढण्या रखडल्या होत्या. जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या भागात कांदा, कापूस, बाजरी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
तर, उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी अशा पिकांना चांगलाच फटका बसला. तर, पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. मात्र, परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही.
ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी उशिराने ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरवात केली. तर, काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारीची उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
मात्र, गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण असल्याने चालू महिन्यात या पेरण्यांना सुरवात होऊन एक ते दीड महिन्यात पेरण्या आटोपतील, अशी शक्यता
आहे.