नगर : तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर व दोन मादी बिबटे पकडल्यानंतरही पाथर्डी तालुक्यातील मोहरी शिवारात पुन्हा एका मादी बिबट्या दोन बछड्यांसह दिसल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्याला लागून असलेल्या मानुर (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (ता. १९) दोन गायींवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर, शिरापूर, मढीसह मोहटादेवी परिसरातील मोहरी, भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू आहे. या भागात तीन बालकांसह अनेक जनावरांचा बिबट्याने बळी घेतला आहे. आतापर्यंत दोन मादी बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पकडले आहे. अजूनही या भागात वीस पेक्षा अधिक पिंजरे लावलेले आहेत. असे असताना काल पुन्हा मोहरी परिसरातील गोसावी वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याची मादी व दोन बछडे सायंकाळी सुनील बन यांच्या
घरामागच्या नाल्याच्या भिंतीलगत दिसले. येथील नरोटे वस्तीवरील पोपट पालवे यांच्या म्हशीला बिबट्याने जखमी केले. यामुळे या भागात अजून काही बिबटे असल्याची शक्यता ग्रहीत धरत शेतकरी धस्तावले आहेत. दरम्यान, पाथर्डी तालुक्याला लागून असलेल्या मानुर (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (ता. १९) दोन गायींवर हल्ला करून जखमी केले. या भागात कापसाचे क्षेत्र अधिक असून, कापूस वेचणीचे काम सुरू आहे. तुरीचे पीकही मोठे झालेले आहे. त्यामुळे बिबट्याला दडण असल्याने धास्ती अधिक वाढली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.