सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आजपासून (ता. २३) सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शक सूचना फलक, वर्गखोल्या व विविध विभागांचे सॅनिटायझेशन, साफसफाई, स्वच्छता पूर्ण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सद्यःस्थितीत लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालयांत अधिक कडक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
पालिकेचे कर्मचारीही शहरातील शाळा व महाविद्यालयांत जाऊन प्रत्येक विभाग सॅनिटायझेशन करत आहेत. याचबरोबर प्रत्येक वर्गात येताना विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग होणार असून, मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षकांचेही कोरोना चाचणीचे अहवाल घेण्यात आले आहेत, तसेच वर्गातील बैठका व्यवस्थाही नियमानुसार होणार आहे.
शाळांमध्ये स्वच्छता अंतिम टप्प्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत. यामध्ये हात स्वच्छ धुणे, मास्क बंधनकारक, विद्यार्थ्यांनी बसताना अंतर ठेवावे आदी प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. याचबरोबर प्रत्येक बेंच व वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन केले आहे. दररोज शाळांचे वर्ग ११ ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहणार आहेत.